मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन, शाळा सुरु करण्यासंबंधी भूमिका, येणारे सण-समारंभ, विकासकामे, मेट्रो कारशेड अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं.
मेट्रो कारशेडच्या जागेचा वाद सद्या पेटला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या टीकांना ठाकरेंनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आरेमध्ये फक्त मुंबई मेट्रोच्या एका लाइनचं काम होणार होतं, पण कांजूरमध्ये मेट्रोच्या ३ लाइनचं काम होऊ शकतं. त्यामुळे केवळ एका लाइनसाठी मेट्रोचं कारशेड आरेमध्ये कशाला? आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे.’ असं ते म्हणाले.
त्यांच्या या संवादाला भाजप नेत्यांनी चांगलंच लक्ष्य केलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील मेट्रो कारशेडचा मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच आजच समाजमाध्यमावरील भाषण म्हणजे कृती व उक्ती यांच्यातल्या अतंराच उत्तम उदाहरण होते. वर्षभर सरकार विकास करीत असल्याचा दावा त्यांनी केला व समर्थनार्थ जी उदाहरण दिली ती सर्व कामे मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती.’ अशी टीका उपाध्येंनी केली आहे.
‘मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाच्या प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे, त्यामुळे अन्यत्र लक्ष वेधण्यापेक्षा उध्दव ठाकरे सरकारने नेमलेल्या मनोज सौनिक सरकारचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आले असते. अभिमान आणि अहंकार यात अंतर असते. मुंबई बद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून मुंबईकरांच नुकसान करीत आहात.’
मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाच्या प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे, त्यामुळे अन्यत्र लक्ष वेधण्यापेक्षा उध्दव ठाकरे सरकारने नेमलेल्या मनोज सौनिक सरकारचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आले असते. ३
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 20, 2020
‘ज्या कांजूरमार्गचे समर्थन करत आहात तिथल्या कारशेड अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीने दाखवून दिले आहेत. कांजूर कारशेडचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही. मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता इतरत काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेन ला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ठ आहे.’ असा टोला केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही. मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता इतरत काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेन ला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ठ आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 20, 2020
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- … म्हणून भाई जगताप यांची निवड कॉंग्रेसचा मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- गडकरींचा धडाका : 11,000 कोटी रुपयांच्या 33 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि भूमीपूजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

