मुंबई : मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांची प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
याशिवाय, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांना जाहीरनामा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही काल करण्यात आली.
आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने मराठी चेहरा पुढे केल्याची चर्चा आहे. भाई जगताप हे अत्यंत आक्रमकपणे पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोचवतील अशी आशा वरिष्ठांना वाटत आहे.
भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय.
भाई जगताप हे रस्त्यावरील आंदोलनांपासून ते टीव्ही डिबेटपर्यंत काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडत असतात. मुंबई काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि युवा नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. तसंच पक्ष संघटनेत प्रदीर्घ अनुभव असणे ही भाई जगताप यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगितले जाते.
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींनी गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट; कॉंग्रेसला मिरच्या झोंबल्या
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- इस्रायलमध्येही करोना लसीकरणाला सुरुवात; पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली लस


