Share

महाआघाडी फक्त राज्यातलं सरकार चालवण्यासाठी; आणखी एका काँग्रेस नेत्याने दिला स्वबळाचा नारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ता तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद पाठोपाठ आता मुंबई महापालिकांमध्ये देखील काँग्रेस स्वबळाने लढण्यास उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस मुंबईचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांच्या पाठोपाठ नव्याने मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती प्रमुखपदी निवड झालेल्या नसीम खान यांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे.

‘युतीबाबत आमचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. सद्याची युती ही फक्त महाराष्ट्रातील सरकार चालवण्यासाठीची आहे. यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा आधार घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी सगळ्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस स्वबळावर लढली पाहिजे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे.’ असं सांगत नसीम खान यांनी काँग्रेस स्वबळावर लढेल याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!