मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन, शाळा सुरु करण्यासंबंधी भूमिका, येणारे सण-समारंभ, विकासकामे, मेट्रो कारशेड अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं.
मेट्रो कारशेडच्या जागेचा वाद सद्या पेटला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या टीकांना ठाकरेंनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आरेमध्ये फक्त मुंबई मेट्रोच्या एका लाइनचं काम होणार होतं, पण कांजूरमध्ये मेट्रोच्या ३ लाइनचं काम होऊ शकतं. त्यामुळे केवळ एका लाइनसाठी मेट्रोचं कारशेड आरेमध्ये कशाला? आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे.’ असं ते म्हणाले.
आता भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या भाषणाला लक्ष्य केलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘कांजूरमार्गच्या जमिनीसाठी भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटावे असे मा.मु उद्धव ठाकरे यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले. आमदारकी मिळवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मा.पंतप्रधानांना फोन केला होता, मग कांजूरमार्गच्या जागेसाठी का करू शकत नाहीत?’ असा सवाल त्यांनी ठाकरेंना केला आहे.
कांजूरमार्गच्या जमिनीसाठी भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटावे असे मा.मु उद्धव ठाकरे यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले.
आमदारकी मिळवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मा.पंतप्रधानांना फोन केला होता, मग कांजूरमार्गच्या जागेसाठी का करू शकत नाहीत? pic.twitter.com/xU1Zo7gAG1— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 20, 2020
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे म्हणतात…कोरोनाची लस आली तरी तब्बल ‘इतके’ महिने मास्क बंधनकारकच
- महाविकास आघाडीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस; जगतापांचा स्वबळाचा नारा तर गायकवाड म्हणतात…
- … म्हणून भाई जगताप यांची निवड कॉंग्रेसचा मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता
- सर्वसामान्यांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित; स्वस्त गाड्यांमध्येही असणार ‘ही’ सुविधा
- आजचं उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे… ‘हा’ भाजप नेता कडाडला


