Share

ठाकरे सरकार राबविणार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना!

Published On: 

मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समन्वयातून राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्रिपद तीन वेळा भूषविलेले पवार येत्या १२ डिसेंबरला वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत असून त्या निमित्ताने राज्य शासनाने त्यांच्या नावे एक योजना सुरू करून गौरव केला आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेद्वारे कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीतील घटक गावं समृद्ध करण या हेतूनं ही योजना राबवण्यात येईल.

चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबवण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हशीकरता पक्का गोठा बांधणं, शेळीपालन शेड बांधणं,कुक्कूटपालन शेड बांधणं तसंच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!