इंदापूर : विधान परिषद निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाविकास आघाडी जोमात असल्याचे दिसून येत आहे मात्र भाजप आणि मित्रपक्षांकडून मात्र सरकार लवकरच कोसळणार असल्याचा वारंवार दावा करण्यात येत असतो. कधी विरोधी पक्षनेते तर कधी केंद्रातील नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याची पुडी सोडत असतात.
दरम्यान असाच काहीसा दावा आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे असून, त्यामध्ये काँग्रेस पक्षास योग्य सन्मान मिळत नाही, असे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पाडेल, असा दावा आठवले यांनी केला.
पुढील पंचवीस वर्ष महाआघाडी सत्तेवर राहण्याचा दावा करत असली तरी त्यांच्यामध्ये सर्व अलबेला नाही. त्यामुळे घोडा मैदान लांब नाही. हे सरकार पडले तर आमची सरकार बनवण्याची तयारी आहे.’’ काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यामध्ये राजकारण सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले. दैनिक सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे दिवस संपले’; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार : शंभूराज देसाई
- आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्नही तातडीने सोडवू : मुश्रीफ
- धडाकेबाज क्रिकेटपटूच्या वडिलांचे ब्रेन कॅन्सरच्या आजाराने निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

