जव्हार – माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. सावरा यांना मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होता. दीर्घकाळापासून ते आजारी होते, अखरे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान त्यांची रुग्णालयात प्राणज्योत माळवली.
दरम्यान, माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
विष्णू सावरा यांनी कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तळागाळातील सामान्य माणसाच्या उत्थानासाठी ते आयुष्यभर झटले . विधानसभेत आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी बुलंद होणारा त्यांचा आवाज त्यांचा सहकारी म्हणून मी जवळून अनुभवला आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आदिवासी समाजात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी कायम परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीची तसेच एकूणच राजकिय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आलेले डिसले गुरुजी कोरोनाच्या विळख्यात!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- ‘विष्णू सावरा यांचे आदिवासी समाजाच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील’


