🕒 1 min read
सोलापूर : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना घोषित करण्यात आला. महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणाऱ्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यानंतर, त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला होता. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांचं कौतुक करून सत्कार केला होता. त्यांच्या या गौरवामुळे महाराष्ट्राची मान जागतिक पातळीवर उंचावली आहे.
मात्र, आता या सर्वच नेत्यांच्या संपर्कात आलेल्या दिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता या सर्व दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे काहीशी काळजी व्यक्त केली जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई वारी केली होती. यावेळी त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने हे सर्व नेते संपर्कात आले होते.
विशेष म्हणजे कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः डिसले गुरुजींनी दिली आहे. माझ्यात काही लक्षणे दिसून आल्यानंतर मी कोरोना चाचणी करून घेतली, ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमचा आवाज दाबू देणार नाही; बंदीनंतरही शिर्डीत प्रवेश करण्यावर तृप्ती देसाई ठाम!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- अखेर सरनाईक पिता-पुत्र ईडीसमोर हजर होणार!
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे : शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

