🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी काल फेटाळून लावला. त्यामुळे आंदोलनाचा तिढा सुटणं कठीण झाल्याचं चित्र आहे.
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारनं तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा आपला प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे सुपूर्द केला आहे. मात्र, हे बदलही शेतकऱ्यांनी नाकारले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. मात्र, आता आम्ही जियो सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही”, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे .
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आलेले डिसले गुरुजी कोरोनाच्या विळख्यात!
- ‘विष्णू सावरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला’
- दानवेंना आता घरात घुसून चोप देण्याची वेळ आली आहे- बच्चू कडू
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- ‘विष्णू सावरा यांचे आदिवासी समाजाच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील’


