🕒 1 min read
जव्हार – माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
सावरा यांना मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होता. दीर्घकाळापासून ते आजारी होते, अखरे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान त्यांची रुग्णालयात प्राणज्योत माळवली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 30 वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आलेले डिसले गुरुजी कोरोनाच्या विळख्यात!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- मुख्यमंत्री आज पुणे-रत्नागिरी-सातारा दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

