अमरावती : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे.या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्य सरकार यासाठी व्यवस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात अनेक सामान्य नागरिकांचे रोजगार गेले. आता कुठे परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. नागरिकांना आपला रोजगार मिळविण्यासाठी सगळीकडे बाहेर फिरावे लागत आहे. लोकांपुढे प्रचंड आर्थीक संकटे आहेत, त्यामळे सर्वसामान्य लोकांना करोनाची लस विकत घेणे शक्य होणार नाही असे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील कोविडची लस सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी अशी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
दरम्यान, ज्या प्रकारे पश्चिम बंगाल सरकार आणि दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सर्वसामान्य लोकांसोबतच सर्वांनाच करोणा ची मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात ठाकरे सरकारने सुद्धा कोविडची लस सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी अशी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकार कडे केली आहे.
दरम्यान,कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार असेल तरीही सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या
- उरी नंतर ‘या’ चित्रपटात विकीची दमदार भूमिका
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- मंदिरांचेही फायर ऑडीट तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्या : आचार्य तुषार भोसले
- ‘सरकार दरबारी जी कामे होत नाहीत ती कामे ‘राज’दरबारी निकालात निघतात’
- धोक्याची घंटा : परभणी पाठोपाठ मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव !


