मुंबई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत.
या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.दरम्यान, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मंदिरांचेही फायर ऑडीट तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्या अशी मागणी केली आहे.
शासकीय गलथान कारभारामुळे भंडाऱ्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण याचबरोबर एक गोष्ट समोर आली आहे की, पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरा सह अनेक देवस्थानांचे फायर ऑडीट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की ज्या देवस्थानांमधे मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशा सर्वच देवस्थानांचे फायर ऑडीट तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. जर असे झाले नाही आणि दुर्दैवाने भंडाऱ्यासारखी घटना देवस्थानांत घडली तर झालेल्या जीवितहानीस ठाकरे सरकार जबाबदार असेल असे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- उरी नंतर ‘या’ चित्रपटात विकीची दमदार भूमिका
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- ‘सरकार दरबारी जी कामे होत नाहीत ती कामे ‘राज’दरबारी निकालात निघतात’
- धोक्याची घंटा : परभणी पाठोपाठ मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
