मुंबई : ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने आज रिलीजला दोन वर्षे पूर्ण केली आहेत. तर याच दिवशी 11 जानेवारी रोजी अभिनेता विकी, दिग्दर्शकआदित्य आणि निर्माता रॉनी या तिघांनी त्यांच्या पुढील ‘अश्वत्थामा’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. ‘अश्वत्थामा’ हा एक वैज्ञानिक चित्रपट असून तो महाभारतातील अध्यायातील पात्र ‘अश्वत्थामावर’ आधारित आहे.
https://www.instagram.com/p/CJ5Rwr3p1sT/?utm_source=ig_web_copy_link
आदित्य दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने सर्वांना चकित केले, उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला. चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विकी कौशलला ‘उरी’ मधील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला, त्याच दिग्दर्शक आदित्य धरनेही त्यांच्या दिग्दर्शनासाठी प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला.
https://www.instagram.com/p/CJ5RchFpPKO/?utm_source=ig_web_copy_link
‘अश्वत्थामा’ हा एक वैज्ञानिक चित्रपट असून तो महाभारतातील अध्यायातील पात्र ‘अश्वत्थामा’वर आधारित आहे. आदित्य या चित्रपटाविषयी म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांत उरीला मिळालेल्या प्रेमामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत. आणि त्या प्रेमाच्या पुढच्या सहकार्याची अपेक्षा पूर्ण करण्याची आणखी एक जबाबदारी नक्कीच आपण घेत आहोत. ‘अश्वत्थामा’च्या सहाय्याने आम्ही भारतभर प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेला नेत्रदीपक व्हिज्युअल सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.विकीने इंस्टग्रामवर पोस्ट शेअर करत ‘अश्वत्थामा’ पोस्टर रिलीज केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र शासनाने संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव या संवेदनशील भागात जाण्यास बंदी घालावी’
- मुंबई हायकोर्टाची सुनावणी, कंगनाला आणखी एका आठवड्याचा दिलासा
- मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षांच्या नव्या तारखा केल्या जाहीर
- आमची सुरक्षा कमी केल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही : चंद्रकांत पाटील
- बीएमसी कारवाईप्रकरणी उच्च न्यायालयाने दिला सोनू सूदला दिलासा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

