Share

भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक रिकी पाँटिंगला भरातीय चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अनेक नेटकऱ्यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करत टीकास्त्र सोडलं आहे. यामध्ये भारताचे माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे.

सिडनी कसोटी सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्यात ८० धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर #AskRicky अंतर्गत एका युजर्सनं भारतीय संघ पाचव्या दिवशी किती धावसंख्यापर्यंत पोहचेल असा प्रश्न रिकी पाँटिंगला विचारला होता. त्यावर बोलताना पाँटिंग म्हणला की, पाचव्या दिवशी भारतीय संघाला २०० धावाही करता येणार नाहीत.

प्रत्येक्षात मात्र पाचव्या दिवशी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यात रोमांच आणला आहे. पुजारानं ७४ तर पंतनं ९७ धावांची निर्णायक खेळी केली आहे. भारतीय संघानं २७५ धावांचा टप्पाही ओलांडाला आहे. भारतीय संघानं २०० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर नेटकऱ्यांनी पाँटिगला ट्रोल केलं आहे. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागनेही एक फोटो पोस्ट करत रिकी पाँटिगला ट्रोल केलं आहे. म्हणतात ना एक फोटो परिस्थिती बोलून दाखवतो.. तशीच अवस्था या फोटमधून पाँटिंगची दिसून येत आहे. सेगवागनं पंतसोबतचा पाँटिंगचा एक फोटो पोस्ट केला आहे. आयपीएलदरम्यानचा हा फोटो आहे.

रिकी पाँटींग सध्या चॅनल 7 वर कॉमेंट्री करत असताना. त्यावेळी त्यानं टीम इंडियावर टीका केली. “ब्रिस्बेनमध्ये न जाण्यासाठी टीम इंडिया कारणं शोधत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय टीमला ब्रिस्बेनमधील क्वारंटाईन विषयीच्या नियमांची चिंता होती. आता त्यांना कोरोनाची भीती सतावत आहे. बायो बबलच्या गोष्टी माझ्यासाठी अजब आहेत. कारण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतीय खेळाडूंपेक्षा जास्त काळ बायो बबलमध्ये राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूही भारताप्रमाणे हॉटेलमध्ये बंद असतील. आम्ही आयपीएल स्पर्धेच्या वेळी कोणत्याही भारतीय खेळाडूकडून याबबतच्या तक्रारी ऐकल्या नाहीत.” अशी टीकाही पाँटिंगनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!