मुंबई : राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात लक्षणीय बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.माजी खासदार नारायण राणे यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दिग्गज नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असली तरीही राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले आहेत.ये पब्लिक है ये सब जाणती है म्हणत नांदगावकरांनी राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढल्याचा सरकारचा निर्णय खुजेपणाचा असल्याची टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.
बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट
सरकार ने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली त्यात राजसाहेब यांचे हि नाव आले. सरकार कोणाचे हि असो वास्तवाचे भान ठेवुन असे निर्णय घ्यायला हवे. राज्यातील जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा नेता , स्वतःच्या पक्षाचा फायदा नुकसान याचा विचार न करता स्पष्ट भूमिका घेणारा नेता , सामान्य लोकांच्या भल्यासाठी अनेकांशी भिडणारा नेता म्हणून राजसाहेब पूर्ण राज्याला माहीत आहे. साहेबांच्या रोख ठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही.
साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटी साठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. साहेबांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे खुजेपण ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती.सरकार ने जनतेला गृहीत धरू नये, ये पब्लिक है ये सब जानती है.
– आपला नम्र
बाळा नांदगावकर
महत्वाच्या बातम्या
- उरी नंतर ‘या’ चित्रपटात विकीची दमदार भूमिका
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाईंची सुरक्षा वाढवली; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
- धोक्याची घंटा : परभणी पाठोपाठ मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

