Share

धोक्याची घंटा : परभणी पाठोपाठ मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव !

Published On: 

मुंबई : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारने त्या संदर्भातील उपाययोजना सुरु केल्या आहेत.

परभणीत 3 दिवसांपूर्वी मुरुंबा तालुक्यातील 800 कोंबड्याचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परभणी जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. यामुळे राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत.

अशातच, राज्यातील चिंता आणखी वाढणार आहे. मुंबई आणि ठाण्यात देखील मृत पक्षांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचे समजत आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी दोन कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचा स्वॅब घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठवण्यात आला होते. त्याचे अहवाल आज आले आहेत. यात दोन्ही कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ठाण्यात देखील अनेक पक्षांचा मृत्यू झाला होता. यातील पाण बगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!