लखनऊ : कोरोना संकटात कितीही नाही म्हणले तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू असल्याचे दिसतेय. अशा कठीण काळातही आरोप-प्रत्यारोप होतच आहे. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार. जिथे तिथे विरोध आणि सत्ताधारी पक्ष टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच काँग्रेसह सर्वच विरोधी पक्षांनी नेहमीच भाजपशासित राज्यांना लक्ष्य केलंय. त्यामुळे आता तेथील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे. काँग्रेस सत्तेत असती, तर काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, अशी टीका त्यांनी केली.
कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना कशा प्रकारे मदत पोहोचवायची, लाभ मिळवून द्यायचे, यासाठी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ उत्तम प्रकारे काम करत आहेत. परिस्थिती हाताळत आहेत. काँग्रेस हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. सर्वांना आता हे माहिती झाले आहे.
स्वतंत्र देव सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ अनेक आघाड्यांवर लढत आहेत. आव्हान, संकटाचे रुपांतर संधीत करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. समाजाचा सहयोग त्यांना मिळत आहे. गाव, गरीब आणि शेतकरी बंधू या संकटातून कसे वाचतील, हे मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अक्षय कुमारच्या मदतीने मराठवाड्यात पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उपलब्ध
- खाकीला काळीमा! ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी डीवायएसपी खिरडकरने घेतले दोन लाख
- खतांची दरवाढ मागे; ‘केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा’, प्रीतम मुंडेंकडून स्वागत
- ‘..त्यामुळेच माध्यमांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पाठलाग सुरू’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
- ‘पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला देखील योग्य मदत करणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा विश्वास


