मुंबई – राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. यातच कोरोना रुग्णाला अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा असताना या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे वारंवार समोर येत आहे आहे. दरम्यान,आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला.
गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने गोरेगावात कारवाई करून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या मोतीलाल नगर परिसरात लिंक रोडनजीक एका हॉटेलच्या किचनमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स दडवून ठेवण्यात आली होती. ही इंजेक्शन्स 20 ते 25 हजार रुग्णांच्या नातेवाईकांना रुपयांना विकली जात होती.
पोलिसांनी धाड टाकली तेव्हा हॉटेलच्या किचनमध्ये 34 रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळाली. याप्रकरणी पोलीस पथकाने याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून या टोळीने ती कुठून आणली याचा तपास केला जात आहे. त्याचप्रमाणे या टोळीने अशा प्रकारे चढ्या दराने किती जणांना या इंजेक्शनची विक्री केली, याचीही चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेना; रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरूच
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

