Share

‘ठाकरे सरकारने काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही’

Published On: 

मुंबई : कोरोना काळात केंद्राच्या मदतीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मोदी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असतांना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

यावर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारचे संकटकाळात काय योगदान आहे. उलट केंद्राकडून जे व्हेंटिलेटर्स दिले ते चोरीला गेल्याची माहिती एक मंत्री देतात. जे आहे ते टिकवता येत नाही, इतकी सरकारची दुर्दशा आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत राज्याची दुरवस्था होताना दिसते. गोरगरीबांना पॅकेज द्यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारकडे केली होती, मात्र त्याकडे महाविकास आघाडी सरकारने त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही, याचा विसर पडलेला दिसतो, असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

मोदी यांनी महाराष्ट्रावर अन्याय केल्याची ओरड करणाऱ्यांनी आणि केंद्राने मदत न केल्याचे रडगाणे गाणाऱ्यांची कुवत तेवढीच आहे. चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू व अनुभवी व्यक्तीने ओढून-ताणून अशी टीका करावी, हे वैफल्यग्रस्त म्हणावे लागेल, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी खरी आकडेवारी लपवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक मास्क, पीपीई किट व हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्या मिळाल्या. व्हेंटिलेटर्स मिळण्याच्या बाबतीत आंध्र प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी संसदेतून जे लेखी उत्तर मिळाले, त्यातली खरी आकडेवारी लपवून चुकीचे तर्कवितर्क लावून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!