Share

TET Scam: पैशाच्या घबाडानंतर आता २५ किलो चांदी, २ किलो सोने आणि हिरे जप्त

Published On: 

पुणे : शिक्षक पात्रता परिक्षा घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या मित्राच्या घरावर पुणे पोलिसांनी धाड टाकली आहे. या धाडीत २५ किलो चांदी, २ किलो सोने आणि हिरे तर कंपनीच्या माजी संचालकाकडूनही मौल्यवान ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे टीईटी घोटाळ्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.

तुकाराम सुपेकडून आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेल्या घबाडाची रक्कम ३ कोटी ९३ लाखांवर पोहोचली आहे. यानंतरही मोठी रक्कम बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत तुकाराम सुपेसह जीए सॉप्टवेअर कंपनीचा माजी संचालक अश्विनकुमार याच्यासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस मजबूत पुरावे गोळा करत आहेत.

या प्रकरणी अटक आरोपींची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे थेट बंगलोर येथील अश्विनकुमारपर्यंत पोहचल्याचे समजले. त्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक शुक्रवारी बंगलोर येथे पोहचले, या ठिकाणी छापा टाकला असता हिरे, सोने, चांदी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!