Share

चिंताजनक! देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. यातच आता महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच यापैकी सर्वाधिक १०८ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर पोहोचली असून महाराष्ट्रात १०८, दिल्लीमध्ये ७९, गुजरातमध्ये ४३ , तेलंगणात ३८, केरळमध्ये ३७, तामिळनाडूत ३४, कर्नाटकात ३१, राजस्थानमध्ये २२, हरयाणा ४, ओडिशा ४, आंध्र प्रदेशमध्ये ४ , जम्मू काश्मीरमध्ये ४, पश्चिम बंगाल ३, उत्तर प्रदेशमध्ये २, चंदीगढमध्ये १, लडाखमध्ये १ तर उत्तराखंडमध्ये १, अशी रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत देशात ११५ रुग्ण बरे झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील ४२, दिल्लीतील २३, गुजरातमधील ५, केरळमध्ये १, कर्नाटक १४, राजस्थानमध्ये १९, हरयाणा २, आंध्र प्रदेश १ , जम्मू काश्मीर ३, पश्चिम बंगाल १, उत्तर प्रदेश २ तसेच लडाखमधील एकाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!