Share

कसोटी महाभारताची! अशी होती वाटचाल भारताच्या दिग्विजयाची

Published On: 

इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला अवघे काही तासच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. २०१९ मध्ये २२ ऑगस्ट रोजी पहिला सामना भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध अँटिगा येथे झाला होता.

या सामन्याआधी डब्ल्युटीसी स्पर्धेच्या गुणतालीकेत भारत आठव्या तर वेस्ट इंडिज हा पहिल्या स्थानावर होता. मात्र, या डावात भारताने अवघ्या १०० धावात वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ बाद करत भारतीय संघाने ३१८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. २०१९ मध्ये ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान भारताचा दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध अँटिगा येथे झाला होता. भारताने हा सामना देखील २५७ धावांनी जिंकला.

भारताचा तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशाखापट्टनम येथे झाला होता. या सामन्यातदेखील दक्षिण अफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा चौथा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान पुणे येथे झाला होता. या सामन्यात देखील अफ्रिकेवर भारतीय संघाला मोठा विजय मिळवला. पाचवा सामना, हिटमॅनच्या द्विशतकामुळे भारताने दक्षिण अफ्रिकेला एका डावाने नमवले. भारताचा सहावा सामना बांग्लादेशविरुद्ध 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान इंदोर येथे झाला होता. या डावात भारतीय संघाने 343 धावांची आघाडी घेतली. भारताचा सातवा सामना बांग्लादेशविरुद्ध २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे झाला होता. या सामन्यात इशांतच्या भेदक माऱ्यापुढे बांग्लादेश एका डावाने पराभुत झाला. या विजयासह सलग चार कसोटी सामने डावाच्या फरकाने जिंकणारा भारत पहिला संघ बनला.

भारताचा आठवा सामना न्युझीलंडविरुद्ध २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वेलींगटन येथे झाला होता. सलग सात कसोटी सामने जिंकुन आत्मविश्वासाने भरपुर भारतीय संघ यावेळी न्युझीलंडला भारी पडणार असे सर्वांचे भाकित होते. मात्र या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने भारताचा विजय रथ रोखला. भारताचा नववा सामना न्युझीलंडविरुद्ध २९ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान क्राईस्टचर्च येथे झाला होता. मागील पराभवातुन धडा घेत भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र याही सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचा दहावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ ते २१ डिसेंबर दरम्यान अॅडलेड येथे झाला होता. या डावात ऑस्ट्रेलिायाने २ गडी गमावत भारतावर ८ गडी राखुन पराभव केला. या सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतुन बाहेर पडला.

भारताचा आकरावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे झाला होता. पहिल्या कसोटी सामन्यातील ३६ वर संपुर्ण संघ बाद झाल्यानंतर भारतीय संघाला सर्वस्तरातुन टिका सहन करावी लागत होती. टिकेचा काटेरी मुकुट कर्णधार कोहलीने अंजिक्य रहाणेच्या मस्तकावर चढवुन पितृत्व रजा घेउन मायदेशी परतला होता. पहिल्या सामन्यातील सुमार कामगीरीनंतर दुसऱ्या सामन्यात भारताला मिळालेला हा विजय खुप आत्मविश्वास देउन गेला. आणि भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारताचा बारावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०७ ते ११ जानेवारी दरम्यान सिडनी येथे झाला होता. हा सामना अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश आले. अनिर्णीत असलेला हा सामना कोणत्याही ऐतिहासिक विजयापेक्षा तसुभरही कमी नव्हता. भारताचा तेरावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ ते १९ जानेवारी दरम्यान ब्रिस्बेन येथे झाला होता. जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सामना सर्वात रोमहर्षक आणि अविस्मरणीय ठरला. पुन्हा एकदा पराभवाची भिती मनाला चाटुन गेली. आणि भारताने ऑस्ट्रेलियाच्या अंहकाराला चिरडुन टाकत विजय साजरा केला.

भारताचा चौदावा सामना इंग्लंडविरुद्ध ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथे झाला होता. यात कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन देखील झाले होते. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. भारताचा पंधरावा सामना इंग्लंडविरुद्ध १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथे झाला होता. या सामन्यात मात्र भारतीय संघाने इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव केला. सामना जिंकला तरी डब्ल्युटीसी अंतिम सामन्याची वाट अजुनही खडतर होती. एक पराभव आणि भारतीय संघ स्पर्धेबाहेर जाणार होता.

भारताचा सोळावा सामना इंग्लंडविरुद्ध २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद येथे झाला होता. हा सामना जिंकुन भारताने डब्ल्युटीसी अंतिम स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले होते. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला मालिकेतील अखेरचा सामना जिंकणे गरजेचे होते. इंग्लंड विजयी झाला तर मात्र ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणार होता. अंतिम सामन्यासाठी एक शेवटचा वार करण्यासाठी भारतीय संघ सज्ज होता. भारताचा सतरावा आणि अखेरचा सामना इंग्लंडविरुद्ध ४ ते ८ मार्च दरम्यान अहमदाबाद येथे झाला होता. डब्ल्युटीसी स्पर्धेतील हा अंतिम सामना होता. या सामन्यात विजय मिळवला तर भारतीय संघाचा डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चीत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या सामन्यातील ३६ धावांचा निचांक करणाऱ्या भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!