मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा सातवा सामना बांग्लादेशविरुद्ध २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे झाला होता.
सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्याप्रमाणे बांग्लादेशची फलंदाजी पुन्हा एकदा या डावात कोसळली. अवघ्या १०६ धावावर बांग्लादेशचा संपुर्ण संघ माघारी तंबुत परतला. शदमान इस्लाम(२९), लिटन दास(२४) आणि नईम हसन(१९) वगळता इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठु शकले नाही. भारताकडुन इंशात शर्माने सर्वाधिक ५ गडी बाद केले. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ९ गडी गमावत ३४७ धावांवर डाव घोषीत केला. भारताकडुन कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक १३६ धावांची शतकी खेळी केली. त्याला चेतेश्वर पुजारा(५५) आणि अंजिक्य रहाणे(५१) यांनी पुरेशी साथ दिली.
२४१ धावांच्या आघाडी घेत भारतीय संघाने बांग्लादेशला फलंदाजीसाठी बोलावले. १३ धावांवर ४ गडी माघारी तंबुत परतले असताना मुशफिकुर रहिमने(७४) महमुदल्लाह(३९) धावांची शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर बांग्लादेशच्या फलंदाजीचे काहीएक चालले नाही आणि बांग्लादेशचा संपुर्ण डाव १९५ धावांवर आटोपला. आणि भारताने हा सामना एक डाव आणि ४६ धावांनी जिंकला. भारताकडुन इशांत शर्माने सर्वाधिक ४ गडी बाद केले. त्यालाच सामनाविर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या विजयासह सलग चार कसोटी सामने डावाच्या फरकाने जिंकणारा भारत पहिला संघ बनला. तर सलग सात कसोटी सामन्यात विजय मिळवत ही भारताची विजयाची प्रदिर्घ मालीका ठरली.
भारतात झालेला हा गुलाबी चेंडुचा पहिला आणि पहिला दिवस रात्र कसोटी सामना होता. या सामन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयने मोठा समारंभ आयोजीत केला होता. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना आमंत्रण देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत
- अजब ! उत्तरप्रदेशात बांधले चक्क कोरोना देवीचे मंदिर, प्रशासनाने केली कारवाई
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दिल्ली दौरा म्हणजे केवळ नाटक’
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप

