Share

‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘शिवसेना हा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने प्रत्येकाला स्वाभिमान आहे. हे वातावरण गेल्या वेळच्या सरकारमध्ये होतं का याबद्दल शंका आहे. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पू्र्ण राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाट महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला होता. तोच कायम राहणार आहे’ असं पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच ‘आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची वाटणी होत होती. पाच वर्ष हे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटलं आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केलं’ असं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

‘राजकारण हे चंचल असतं, ते कोणालाही ते मुठीत ठेवणं जमलं नाही. ते आतापर्यंत नेहरुंना ताब्यात ठेवता आलं नाही, इंदिरा गांधींनाही ते आपल्या मुठीत ठेवता आलं नाही. त्यानंतरच्या वाजपेयींनाही हे शक्य झालं नाही. त्यामुळे कोणी कायम राजकारणात सत्तेत राहिल असं नाही’ असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!