🕒 1 min read
मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा पंधरावा सामना इंग्लंडविरुद्ध १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथे झाला होता.
इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी गमावल्याने डब्ल्युटीसी स्पर्धेतील भारताची वाटचाल खडतर झाली होती. मालिकेतील एकजरी सामना भारताने गमावला तर भारताचे डब्ल्युटीसी स्पर्धेचे स्वप्न धुळीस मिळणार होते. नशिबाची साथ भारताच्या बाजुने होती त्यामुळे नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजुने लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने पहिल्या डावात ३२९ धावांची मजल मारली. हिटमॅन शर्माने भारताकडुन सर्वाधिक १६१ धावांची शतकी खेळी साकारली होती. उपकर्णधार अंजिक्य रहाणे(६७) आणि रिषभ पंत(५८) यांनी त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडकडुन या डावात मोईन अलीने सर्वाधिक ४ गडी बाद केले.
यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात चांगली कामगीरी बजावली आणि इंग्लंडचा डाव १३४ धावांवर अटोपला. बेन स्टोक्सने इंग्लंडकडुन सर्वाधिक ४२ धावांची खेळी साकारली होती. तर भारताकडुन आर अश्विनने सर्वाधीक ५ गडी बाद केले होते. भारताने पहिल्या डावातील ३२९ धावांच्या आघाडीवर १९५ धावांची भक्कम आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाची १०६ वर ६ बाद अशी दाणादाण उडाली.
यावेळी कर्णधार विराट कोहली (७२) आणि आर अश्विनने (१०६) ९६ धावांची खेळी करत भारताला संकटातुन बाहेर काढले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावांची मजल मारली. या डावात आर अश्विनने फलंदाजीत चमक दाखवत शानदार १०६ धावांची शतकी खेळी साकारली. तर या डावात इंग्लंडकडुन जॅक लिच आणि मोईन अली दोघांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले.
पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ४८२ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. अक्षर पटेल आणि आर अश्विनच्या फिरकीसमोर पुन्हा इंग्लंडच्या संघाचा डाव कोसळला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ केवळ १६४ धावापर्यंत मजल मारु शकला. यासह भारताने या सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवत पहिल्या सामन्यातील विजयाची परतफेड केली.
अष्टपैलु खेळीसाठी आर अश्विनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाच सामन्यात ५ बळी आणि शतक असा पराक्रम ३ वेळा करणारा हा जगातील दुसराच खेळाडू ठरला. तर आठव्या क्रमांकावर ३ शतके करणारा जगातील दुसराच खेळाडू ठरला. सामना जिंकला तरी डब्ल्युटीसी अंतिम सामन्याची वाट अजुनही खडतर होती. एक पराभव आणि भारतीय संघ स्पर्धेबाहेर जाणार होता.
महत्वाच्या बातम्या
- एकटा संभाजी काय करणार ?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी – शाहू महाराज
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवा भेटायला जाणार’ ; संभाजीराजेंची माहिती
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
