Share

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवा भेटायला जाणार’ ; संभाजीराजेंची माहिती

Published On: 

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज मराठा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाची हाक दिली होती .याच पार्श्वभूमीवरआज कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन आज पार पडले आहे. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात केली.

कोल्हापुरातील या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील मूक मोर्चाला आमदार, खासदारांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली.

दरम्यान आता खासदार संभाजीराजे छत्रपती परवा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. कोल्हापुरातील मूक आंदोलनाची सांगता झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती दिली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावर या भेटीमधून तोडगा निघणार का ? व संभाजीराजे यांनी घेतलेला आंदोलनाचा पवित्रा मुख्यमंत्र्यांच्या भेटींनंतर मवाळ होणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!