कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी देखील आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. सर्व 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. असा थेट आरोप शाहू महाराज यांनी केला आहे. तर नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भेट घेतली या भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती शाहू महाराज यांनी याप्रसंगी बोलताना दिली आहे.
मराठा समाजाचा हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय काही होणार नाही. असं देखील शाहू महाराज म्हणाले आहेत. दरम्यान, मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे. केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं असे आवाहन देखील शाहू महाराज यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवा भेटायला जाणार’ ; संभाजीराजेंची माहिती
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
