श्रीनगर : जम्मूमधील बसस्थानकाजवळ रविवारी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
Seven-kilogram Improvised Explosive Device detected near general bus stand in Jammu, averting major tragedy and plan of terrorists to set off explosion on second anniversary of 2019 Pulwama attack: Officials
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2021
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा कट रचत होते, परंतु तत्पूर्वीच जम्मू पोलिसांनी स्फोटके हस्तगत करून कट उधळला आहे. याबाबत जम्मूचे आयजीपी मुकेश सिंह सायंकाळी 4.30 वाजता माध्यमांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते नुकत्याच अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांचीही माहिती देणार आहेत.
तत्पूर्वी, शनिवारी अनंतनाग पोलिसांनी सांबा परिसरातून द रजिस्ट्रेशन फ्रंटचा (टीआरएफ) दहशतवादी जहूर अहमद राथेर याला अटक केली होती. त्याच्यावर भाजपाच्या तीन नेत्यांच्या आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा आरोप आहे. त्याने पीओकेमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते आणि त्यानंतर राजौरी भागात घुसखोरी करून तो भारतात परतला होता.
दहशतवाद्यांची भरती करण्यात आणि टीआरएफला शस्त्रे पुरविण्यात त्याचा सहभाग होता. 2006 मध्ये त्याने शरणागती पत्करली, परंतु 2020 मध्ये त्याने पुन्हा टीआरएफसाठी गुन्हे करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मिरात अब्दुल्ला पिता-पुत्र नजरकैदेत, पुलवाम्याला जाण्याची परवानगी नाही
- पंतचे दमदार अर्धशतकटीम; इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- ‘लव इज इन द एयर’, मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या दिल्या खास शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

