🕒 1 min read
श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांना श्रीनगरमधील त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून ही माहिती दिली. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना काल पुलवामा येथे भेट देण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.
ओमर अब्दुल्लांच्या घरासमोर मोबाइल सुरक्षा वाहन तैनात आहे. त्यांचे वडील फारूक अब्दुल्ला काश्मीर खोऱ्यातील गांदरबल भागाला भेट देणार होते, तर ओमर आज गुलमर्गला जाणार होते. पोलिसांनी मात्र निवेदनात म्हटले आहे की, पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त हे पाऊल उचलण्यात आले आहे.
This is the “naya/new J&K” after Aug 2019. We get locked up in our homes with no explanation. It’s bad enough they’ve locked my father (a sitting MP) & me in our home, they’ve locked my sister & her kids in their home as well. pic.twitter.com/89vOgjD5WM
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 14, 2021
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, ‘ऑगस्ट 2019 नंतर हे नवीन जम्मू-काश्मीर आहे. आम्हाला काहीही न बोलता आमच्या घरात बंदिस्त केले आहे. माझ्या खासदार वडिलांना आणि मला आमच्याच घरात कैद केले आहे, ही अत्यंत वाईट बाब आहे. त्याचप्रमाणे माझी बहीण आणि तिची मुले यांनाही त्यांच्याच घरांमध्ये बंद करण्यात आले आहे.
ओमर अब्दुल्ला म्हणाले, लोकशाहीचे आपले नवीन मॉडेल म्हणजे कोणतेही स्पष्टीकरण न देता आम्हाला आमच्या घरात बंदिस्त ठेवणे आहे. एवढेच नाही तर घरी काम करणाऱ्या स्टाफलाही कामासाठी घरी येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अन् तुम्ही म्हणता मी अजूनही नाराज आहे.
Placed under house arrest as usual for trying to visit the family of Athar Mushtaq killed allegedly in a fake encounter. His father was booked under UAPA for demanding his dead body. This the normalcy GOI wants to showcase to the EU delegation visiting Kashmir. pic.twitter.com/xFkcqTGQyV
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) February 13, 2021
तर मेहबूबा मुफ्ती यांनीही याची तक्रार केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर पडताना रोखण्यात आले होते. मेहबुबा म्हणाल्या की, बनावट चकमकीत कथितरीत्या मारण्यात आलेल्या अतहर मुश्ताकच्या कुटुंबाला त्या भेटणार होत्या, परंतु त्यांना नजरकैदे ठेवण्यात आले.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला नजरकैदेतून सुटल्यानंतर गतवर्षी 24 मार्च रोजी त्यांच्या घरी पोहोचले. कलम 370 काढून टाकल्यानंतर ओमर यांना 5 ऑगस्ट 2019 रोजी ताब्यात घेण्यात आले होते. नजरकैदेत राहिल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, त्यांनी 232 दिवसांच्या नजरकैदेनंतर हरि निवास सोडले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारपासून राष्ट्रवादीची संवाद यात्रा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बीडमधून प्रारंभ
- पंतचे दमदार अर्धशतकटीम; इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- ‘लव इज इन द एयर’, मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या दिल्या खास शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

