🕒 1 min read
मुंबई: देशभरात गाजलेल्या हिजाब वादावर आज (१५ मार्च) कर्नाटक न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नसून हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही. असे म्हणत शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh reaction) यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“शिक्षणाच्या मंदिराला धर्माचा आखाडा बनवू नये. वर्गात निर्धारित गणवेशात जावे. माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान कर्नाटकातील शाळेतील हिजाब बंदीवर कोर्टाकडूनही आता शिक्कामोर्तब झाले आहे. उडूपीच्या मुलींनी कोर्टात याचिका दाखल करून शाळेत हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
शिक्षा के मंदिर को मजहब का अखाड़ा नहीं बनाना चाहिए..
क्लास में निर्धारित यूनिफॉर्म में ही जाना चाहिए।
सन्माननीय कर्नाटक हायकोर्ट के फैसले का हम स्वागत करते हे !!@BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Karnataka @Dev_Fadnavis @CTRavi_BJP @ChDadaPatil #HijabControversy— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 15, 2022
दरम्यान याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. सदरील प्रकरण उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला आणि त्यानंतर बराच विरोध करण्यात आला. तर दुरीकडे काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घेऊन आल्याने हा वाद अजूनच चिघळला होता. याचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटले होते. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान हिजाब प्रकरणी मुलींनी हायकोर्टात जाऊन हिजाब परिधान करुन वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी केली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब किंवा भगवी शाल घालण्यास परवानगी नसल्याचा अंतरिम आदेश जारी केल्याने याचिकाकर्त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
महत्वाच्या बातम्या :
- फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- “संजय राऊतांनी केलेल्या आरोपींची सीबीआय चौकशी करण्यात यावी अन्यथा…”, मोहित कंबोज यांचा इशारा
- VIDEO: पुण्याच्या लक्ष्मी रोडवर ‘नो पार्किंग’मधील स्कूटर पोलिसांनी सामानासकट उचलली
- उज्ज्वला योजनेंतर्गत ‘या’ होळीला मिळणार मोफत गॅस सिलिंडर!
- श्रीलंकाविरुद्ध अप्रतिम कामगिरी करण्याऱ्या श्रेयसची अश्विनसोबत जुनी मुलाखत होतेय व्हायरल; म्हणाला होता…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
