Share

श्रीलंकाविरुद्ध अप्रतिम कामगिरी करण्याऱ्या श्रेयसची अश्विनसोबत जुनी मुलाखत होतेय व्हायरल; म्हणाला होता…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करणे सुरु केले आहे. उजव्या हाताच्या या खेळाडूने आतापर्यंतच्या ४ कसोटी सामन्यातच इतिहासाच्या पुस्तकांमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका गुलाबी बॉल कसोटीत त्याच्या विक्रमी दुहेरी अर्धशतकांमुळे भारताने विजय मिळवला. ज्यानंतर त्याचा अश्विनला दिलेल्या एका मुलखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अगदी एक वर्षापूर्वी, आयपीएल २०२१ सुरू होण्यापूर्वी, अय्यर (shreays iyer) अश्विनच्या (ravichandran ashwin) युट्युब टॉक शो, “डीआरएस विथ अश्विन” मध्ये एका एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून उपस्थित होता. तेव्हा त्यांने त्याच्या स्थानिक कारकिर्दीबद्दल, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना, त्याच्या कसोटी आकांक्षांबद्दल अश्विनने अय्यरला विचारले. त्यावेळी अय्यरला कसोटीत पदार्पण करायचे होते. अश्विनने अय्यरच्या कसोटी आकांक्षांबद्दल विचारले तेव्हा, एक मनोरंजक कथा सांगताना तो निराश झालेला दिसला.

अश्विनच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रेयस म्हणाला, “साहजिकच, जेव्हा मी पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा माझी इच्छा पहिले कसोटी क्रिकेट खेळायची होती. आतापर्यंतचा माझा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड खरोखरच अप्रतिम आहे. मी नेहमीच देशांतर्गत आक्रमक क्रिकेट खेळलो आहे, पण, हो, मला कसोटीत संधी मिळाली नाही. मी पदार्पण केले नाही पण तरीही एक रन आऊट माझ्या नावावर आहे. माझ्यासाठी ती एक उपलब्धी आहे. धर्मशाला येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना झाला होता. विराटच्या खांद्याला समस्या होती आणि मी बदली खेळाडू (क्षेत्ररक्षक) म्हणून आलो होतो.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!