उत्तर प्रदेश – यूपी सरकार उज्ज्वला योजनेंतर्गत या होळीमध्ये पहिला मोफत गॅस सिलिंडर देण्याची तयारी करत आहे, अशी माहिती आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने होळीच्या दिवशी गॅस सिलिंडर देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आता लवकरच गॅस सिलिंडर वाटप करण्यात येणार आहेत.
राज्यात उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तब्बल १.६५ कोटी आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ठराव पत्रात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळीला मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. आता होळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे त्यामुळे त्याची तयारी सुरु झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने सोमवारी आपला प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर वित्त विभागाकडून अंदाजपत्रक जारी करून जिल्ह्यांमध्ये सिलिंडर दिले जाणार आहेत.
मोफत रेशन योजनेतही वाढ करणार –
राज्य सरकार मोफत रेशन योजनेतही वाढ करणार आहे. यासाठी सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रस्ताव मागवला आहे. यापूर्वी सरकार डिसेंबर ते मार्चपर्यंत मोफत रेशन देत होते. मोफत रेशनची व्यवस्था या महिन्यात संपत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत उपलब्ध गहू आणि तांदूळ मोफत दिले जात आहेत, तर सरकारकडून हरभरा, मीठ आणि तेलही दिले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत दोन सिलिंडर आणि मोफत रेशन देण्याची योजना पुढे नेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे यानुसार कामाला सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –


