Share

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता प्रविण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली असल्याचेही दरेकर म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की,‘सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली असून अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचे हे षडयंत्र सुरु आहे. परंतु हाती काही लागले नाही.’ तसेच भाजपवर दबाव आणून आपल्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईला ब्रेक लावता येईल का यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा दावाही दरेकर यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा विधानसभेत केला होता. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रविण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे दरेकरांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!