Share

“संजय राऊतांनी केलेल्या आरोपींची सीबीआय चौकशी करण्यात यावी अन्यथा…”, मोहित कंबोज यांचा इशारा

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन ईडीवर गंभीर आरोप केले होते. आता यावरच भाजप नेते मोहित कंबोज यांनी थेट राऊतांना आव्हान दिले आहे. राऊत यांनी केलेल्या आरोपींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशारा मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचे वसुली अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांना सध्या दिल्लीत पदोन्नती मिळाली आहे. जितेंद्र नवलानी हे ७ कंपन्याचे संचालक असून त्यांच्या या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने नवलानी आणि त्यांच्या पत्नीला बेनामी संपत्तीप्रकरणी नोटीसही पाठवली होती. असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

मोहित कंबोज काय म्हणाले?

8 मार्च रोजी राऊत यांनी खूप आरोप केले होते. सलीम-जावेद जसे नवीन काल्पनिक एपिसोड घेऊन येतात तसे राऊत हे एपिसोड घेऊन आले. राऊत यांनी जे आरोप दिले आणि माहिती दिली ती अर्धवट होती. जीतू नवलानी अनेकांकडून पैसे घेत असल्याचे म्हणत त्यांनी १३ पानांचे पत्र दिले. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असून जीतू नवलानीने ईडीच्या नावाने पैसे घेतल्याचं त्यांनी म्हटलं. जर या आरोपात तथ्य असते तर राऊत यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली असती म्हणून या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. तसेच हे आरोप करताना उद्धव ठाकरे यांची सहमती होती का? मुख्यमंत्र्यांनी याबाबत सीबीआयला पत्र लिहिले पाहिजे. या पत्रात काहीही सत्य नाही. स्वत:ला वाचवण्यासाठी हा खेळ खेळत आहेत. असा आरोपही कंबोज यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!