🕒 1 min read
न्यूयॉर्क : तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू सध्या पत्नीसोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आत्ताच या दोघांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली आहे. महेश बाबूने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा फोटो खूप व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये यांची भेट झाली. यावेळी या पती पत्नीने बिल गेट्स यांच्यासोबत फोटो काढला.
बिल गेट्स सोबतचा फोटो महेश बाबू ने त्याच्या इंस्टाग्रावरून शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘बिल गेट्स यांना भेटून आनंद झाला. या जगाने पाहिलेल्या महान दूरदर्शी व्यक्तींपैकी ते एक आहेत आणि तरीही ते सर्वात नम्र आहे. खरोखर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’.
https://www.instagram.com/p/CfYGCEwvBtR/
मागच्या काहीदिवसंपूर्वी महेश बाबू त्याच्या बॉलिवूड पदार्पणाविषयीच्या विधानामुळे चांगलाच चर्चेत आला होता. “बॉलिवूडला मी परवडणार नाही” असं त्याने म्हटले होते.
बॉलिवूडला कमी लेखल्याबद्दल त्याच्यावर टीका झाली होती. त्याला या विधानामुळे ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
