लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत लोकसंख्या धोरण जाहीर केले. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेश राज्य कायदा आयोगाने (UPSLC) लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा पहिला मसुदा वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे.
यामध्ये परिवार नियोजन करण्यासह अनेक योजना राबाविण्याचा विचार सुरू असून एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण, विमा, यासोबत शासकीय नोकरित प्राधान्य असे अनेक लाभ या लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देणार असल्याचे या धोरणात म्हटले आहे. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या असून, योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यातच आता काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी योगी सरकारवर निशाणा साधत ‘तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुले ते आधी सांगा,’ अशी विचारणा केली आहे.
योगी सरकारने आणलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकानुसार, दोनपेक्षा अधिक मुलंबाळं असणाऱ्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत, सरकारी नोकरीसाठी ते पात्र नसतील, तसंच पदोन्नती तसंच सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. यावरून सलमान खुर्शीद यांनी योगी सरकारवर खोचक टीका केली आहे.
तर योगींनी घेतलेल्या या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे अशा राज्यांमध्ये लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कायदा करणं आवश्यक असून गरज असल्यास देशातही अशा प्रकारचा कायदा लागू झाला पाहिजे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना इफेक्ट! कंत्राटी क्रिडा शिक्षकांपुढील आर्थिक संकट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘रिपब्लिकन ऐक्य आता कठीण’, रामदास आठवलेंनी बोलून दाखवली खंत
- स्मार्ट औरंगाबाद गप्पा… मात्र, महत्त्वाच्या जालना रस्त्यावरील मेलेला कुत्रा उचलायलाही वेळ नाही?
- आता गडकरीही म्हणाले, ‘इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप’; सुचवला ‘हा’ पर्याय
- गडकरींचा धडाका; तब्बल 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन


