Share

कोरोना इफेक्ट! कंत्राटी क्रिडा शिक्षकांपुढील आर्थिक संकट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

औरंगाबाद : आदिवासी विकास विभागातील क्रीडा मानधन शिक्षकांना २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी नेमणुक करण्यात यावी, तसेच कंत्राटी क्रीडा शिक्षकांना सेवेत कायम करावे, त्यांच्यावर आलेले आर्थिक संकट दूर करावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदिवासी मंत्री के.सी पाडवी यांच्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शाळेत क्रिडा शिक्षक, मार्गदर्शकाचे पद मंजूर नसल्याने येथील विद्यार्थ्यांना बदलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळातील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, शास्त्रोक्त माहिती आदी बाबींपासून वंचित राहावे लागत आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत गेल्या तीन वर्षापासुन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिक्षकांची मानधनावर नेमणुक करण्यात आली होती. मात्र २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी आदेश निर्गमित करण्यात आले नाही. परिणामी, राज्यभरातील पाचशेहून अधिक मानधन कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानूभूतीपूर्वक विचार करुन चालु सत्रापासून त्यांना मानधनावर त्वरीत नियुक्ती आदेश मिळावेत, असे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोविडमुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ३० एप्रिल २०२० पर्यंत सदरील मानधन शिक्षकांचे आदेश असताना क्रीडा शिक्षकांचे एप्रिल २०२० पर्यंतचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. परिणामी, प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत क्रिडा शिक्षक नियमित पद मंजूर होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने एक क्रिडा शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अशी देखील मागणी शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदिवासी मंत्री के.सी पाडवी यांच्याकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!