Share

‘रिपब्लिकन ऐक्य आता कठीण’, रामदास आठवलेंनी बोलून दाखवली खंत

Published On: 

मुंबई : संघर्ष करणाऱ्या तरुणांचे चेहरे पाहतो मी आणि शहीद भीमसैनिकांना श्रद्धांजली वाहतो मी असे सांगत आंबेडकरी चळवळीला तलवारीची धार आहे. त्यासाठी गटतट गाडून सर्वांनी एकत्र आले पाहिजे, ऐक्य केले पाहिजे. रिपब्लिकन ऐक्य आता कठीण आहे. ऐक्य करायचे असेल तर कार्यकर्त्यांनी आपआपल्या वस्तीतून ऐक्याची सुरुवात केली पाहिजे. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले

सर्व गट विसर्जित करून वस्तीत ऐक्य घडविले पाहिजे. असे रिपब्लिकन ऐक्य मान्य नसणाऱ्या आणि ऐक्यातून फुटणाऱ्या नेत्यांना आपल्या वस्तीत प्रवेशबंदी करा असे रामदास आठवले म्हणाले आहेत. माता रमाबाई आंबेडकर नगरातील शहिदांच्या 24 व्या स्मृतिदिना निमित्त रिपाइं तर्फे आयोजित जाहीर श्रद्धांजली सभेत रामदास आठवले बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष मी संपूर्ण देशात पोहोचविला आहे.काही जणांनी रिपब्लिकन नाव पुसण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मात्र रिपब्लिकन नाव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष म्हणून संपूर्ण देशात मजबूत करू असा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!