Share

स्मार्ट औरंगाबादच्या गप्पा… मात्र, महत्त्वाच्या जालना रस्त्यावरील मेलेला कुत्रा उचलायलाही वेळ नाही?

Published On: 

औरंगाबाद : शहरातील एपीआय कॉर्नर ब्रिजच्या समोर सोमवारी (दि.१२) सकाळपासून एक कुत्रा मेलेल्या अवस्थेत पडला आहे. कदाचित रात्रीपासून हा कुत्रा या ठिकाणी मृतावस्थेत असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली असून कुत्र्याचा मृतदेह कुजत चालला आहे. मात्र अजूनही मनपा प्रशासनाचे याकडे लक्ष गेलेले नाही. मुख्य रस्ता असलेल्या या जालना रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. रस्त्याचा बाजूलाच पडलेला या कुत्र्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प राबवणाऱ्या स्मार्ट शहरात मेलेल्या कुत्र्यांना उचलण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय नसेल तर हि असली कसली स्मार्ट सिटी? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.

शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आज घडीला शहरात ३० हजारांच्या सुमारास कुत्र्यांची संख्या असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. शहरातील उच्चभ्रू,सामान्य, स्लम अशा सर्वच भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मात्र त्याचबरोबर शहरात मेलेल्या कुत्र्यांना उचलण्यासाठी महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतांना दिसत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध प्रकल्प सुरु आहेत. लव्ह औरंगाबाद, सायकल ट्रॅक, स्ट्रीट फॉर पीपल असे विविध प्रकल्प वेगात सुरु आहेत.

मात्र स्वच्छता, दुर्गंधीमुक्त शहर, खड्डे मुक्त रस्ते या नागरिकांच्या मुलभूत गरजा पालिका पूर्ण करु शकत नाही. सोमवारी सकाळपासून एपीआय कॉर्नर याठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजूला मेलेल्या कुत्र्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. सध्या कोरोनामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न एेरणीवर आलेला आहे. असे असतानाही नागरिकांच्या आरोग्याशी पालिका प्रशासन एक प्रकारे खेळतच आहे. या कुत्र्याचा मृतदेह पूर्णपणे कुजण्याआधी तरी स्मार्ट सिटीच्या स्मार्ट पालिकेला जाग यावी, एवढीच अपेक्षा!

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!