🕒 1 min read
नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा धडाका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गडकरी यांनी आज मणिपूरमध्ये 298 किलोमीटर लांबीच्या 4,148 कोटी रुपये खर्चाच्या 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे मणिपूरला देशाचा उर्वरित भाग आणि शेजारी देशांना जोडणारे सर्व प्रकारच्या हवामानाला अनुकूल रस्ते उपलब्ध होतील.
या प्रकल्पामुळेया प्रदेशाच्या कृषी, औद्योगिक आणि सामाजिक आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. तसेच दुर्गम भागात आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध होतील आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी निर्माण होतील. इंफाळ येथे प्रकल्पांचे उद्घाटन करताना गडकरी म्हणाले की, राज्यासाठी 5000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे आणि विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सहा महिन्यांत पूर्ण होतील आणि एका वर्षाच्या आत काम सुरू होईल.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, भारतमाला टप्पा ll अंतर्गत राज्यातील महामार्गांच्या विस्ताराची शिफारस केली जाईल .ते म्हणाले की पंतप्रधान ईशान्य प्रदेशाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत.रस्ते संबंधी पायाभूत सुविधा मणिपूरच्या विकासाला हातभार लावतील आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या बळकट बनवतील असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस


