Share

आता गडकरीही म्हणाले, ‘इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप’; सुचवला ‘हा’ पर्याय

Published On: 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असली तरी कंपन्यांकडून दरवाढीचा सपाटा सुरुच आहे. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ होत आहे. डिझेल देखील शंभरी पार करण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे कोरोनाने आर्थिक स्थिती बिकट झालेल्या सामन्यांना अधिकच भार सोसावा लागत आहे.

देशभरात विरोधकांनी केंद्र सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. इंधन दरवाढीवर इतर केंद्रीय मंत्री भाष्य करत नसल्याचे दिसून आले होते. आता केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीवर भाष्य केलं असून यावर उपाय देखील सुचवला आहे.

‘इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप, राग आहे. याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी पर्यायी इंधनाच्या प्रयोगांवर जोर देण्याची गरज व्यक्त आहे.’ असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलच्या प्रयोगांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं देखील ते म्हणाले.

रविवारी नागपूरमध्ये देशातील पहिल्या लिक्विफाइड नैसर्गिक गॅस (LNG) फिलिंग सेंटरचं उदघाटन केलं. ‘वाहनांमध्ये इंधनाच्या रुपात इथेनॉलचा उपयोग केल्यास पेट्रोलच्या तुलनेत कमीत कमी 20 रुपये प्रती लिटर वाचवता येईल,’ असा पर्याय गडकरी यांनी सुचवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!