🕒 1 min read
पाटणा : भारत देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागार प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावरून आज लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना अचानक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण आली. यावेळी तेजस्वी यादव यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर पण तोफ डागली.
केंद्रीय तपासयंत्रणा या सर्वच काम भारत सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या आदेशानुसार करत असतात असे आज तेजस्वी यादव म्हणाले. या देशात जो कोणी व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा विरोध करत असतो त्याला केंद्र सरकार कडून मुद्दामून त्रास दिला जातो. परंतु जो कोणी भारतीय जनता पक्षाबरोबर जातो त्याचे सगळे गुन्हे, प्रकरण माफ केली जातात असेही आज तेजस्वी यादव म्हणाले. भारतीय जनता पक्षाबरोबर जो कोणी जातो त्याचे सगळे पाप धुतले जात यावरून त्यांनी अजित पवार यांचे पण उधाहरण दिले. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून अजित पवार यांनी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये प्रवेश केला होता. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे शपथ घेतली होती आणि याच शपथेमुळे अजित पवार यांच्यावरील जलसिंचन घोटाळ्याची ९ प्रकरणे मिटविण्यात आली होती. मात्र ते जेव्हा परत राष्ट्रवादीकडे गेले तेव्हा त्यांच्या मागे पुन्हा ईडी आणि सीबीआयचे भूत लाववण्यात आले.
याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो जातो त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या बरोबर जो जातो त्याला स्वछ केले जाते असेही आज तेजस्वी यादव म्हणाले आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या :
- “…तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा”, राऊतांच्या ‘भ***’ वक्तव्यावर सोमय्या संतापले
- वेस्ट इंडिजला पराभूत करताच भारतीय संघ बनला “वर्ल्ड नं. १”
- “चारीमुंड्या चीत करूनच पाटील नावाचा नाही निघाला तर…”, गुलाबराव पाटलांचे खडसेंना थेट आव्हान
- IND vs WI: भारताने केला सलग दुसऱ्यांदा विंडीचा व्हाईट वॉश
- “ ते म्हणाले होते, मी असे पर्यंत तुझे संघातील स्थान अढळ मात्र..” ; साहाचा गांगुलीबाबत मोठा खुलासा


