Share

वेस्ट इंडिजला पराभूत करताच भारतीय संघ बनला “वर्ल्ड नं. १”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध टी २० मालिका ३-० ने जिंकली आहे. याआधी भारताने एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केले होते. भारतीय संघ मालिका जिंकल्यानंतर सहा वर्षांत प्रथमच ICC T20I संघ क्रमवारीत क्रमांक वर्ल्ड नं १ बनली आहे. भारताने माजी टी २० वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला मागे टाकून २६९ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली १२ फेब्रुवारी २०१६ ते ३ मे २०१६ या कालावधीत भारत टी २० फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. भारतीय संघाचा शेवटचा पराभव २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यात न्यूझीलँडविरुद्ध झाला होता आणि स्पर्धेतील त्यांनी अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड विरुद्ध उर्वरित तीन सामने जिंकले होते.

विराट कोहलीने टी २० चे कर्णधारपद सोडल्यानंतर आता नव कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया क्रमवारीत अव्वल ठरली आहे. रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर भारताने एकही मालिका गमावली नाहीये. वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यावरही विंडीजला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाची सुरुवात अव्वल झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!