जळगाव: राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी नेत्यांतील अंतर्गत वाद रंगत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी जळगावात मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे म्हणत शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Shiv Sena leader and Guardian Minister Gulabrao Patil) यांच्यावरही टीका केली होती. आता यावरच गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिले आहे.
“काही लोक माझ्याबद्दल नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलवं, चारीमुंड्या चीत करूनचं हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही”, असे थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. तसेच त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही गद्दारांना जागा नव्हती. असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
“आमचे वडिलोपार्जित कोणी राजकारणात नव्हते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभावी व नामर्दांना स्थान नसलेली संघटना शिवसेना आली आणि त्यात मी सहभागी झालो. आमदार-खासदार मुख्यमंत्री शिवसेनेचे होणार असा स्वप्नातही विचार नव्हता. मात्र त्यामुळे मी मंत्रीपदावर आहे, मात्र काहींना आजही मुख्यमंत्री पदाची आस आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यांच्याकडून शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय”, संजय राऊतांचा मोदींना टोला
- IND vs WI: भारताने केला सलग दुसऱ्यांदा विंडीचा व्हाईट वॉश
- “सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला…”, रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
- “महाराष्ट्राविषयी द्वेष असणाऱ्या लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं”, संजय राऊतांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
- पालकमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का; किसननगरमधील शिवसैनिक भाजपात


