🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) वापरत असलेल्या भाषा शैलीवर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी भ** शब्द वापरल्याने त्यांच्यावर बरीच टीकेची झोड उठली. यावरच सोमय्या यांनी राऊत यांना त्या शब्दांचा अर्थ कळतो का, असा सवाल करत नसेल कळत तर तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा, असे आवाहन केले आहे.
माझी सून मराठी आहे. राऊत यांची चोरी, लबाडी उघड होते. म्हणून ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलत असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी सचिन वाझेंसारखा महान व्यक्ती नाही, तो सर्वात प्रामाणिक अधिकारी असल्याचं गुणगाण उद्धव ठाकरेंनी केलं. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्यानं वाझेचं गुणगाण गायलं. राऊत हे पहिले प्रवक्ते, तर वाझे हे सेनेचे दुसरे प्रवक्ते आहेत. माझा राऊतांबद्दल द्वेष नाही. मात्र, ही उद्धव ठाकरेंची भाषा आहे. असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.
दरम्यान पुढे सोमय्या म्हणाले की, “राऊतांनी मला पत्र लिहिलं होतं. प्रिय श्री किरीट सोमय्याजी ११ ऑक्टोबर २०२१ जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार, शासकीय पैशाचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण उघड केल्याने राष्ट्रावर उपकार झाले. अनेकांना तुरुंगात जावं लागले. भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढ्याला बळ मिळावं. राऊत एकीकडे कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांपासून इतर लोक म्हणतात सोमय्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा.”
महत्वाच्या बातम्या:
- वेस्ट इंडिजला पराभूत करताच भारतीय संघ बनला “वर्ल्ड नं. १”
- “…कॉंग्रेसला पुन्हा डावललेच,किती ही मानहानी”, केशव उपाध्येंचा खोचक टोला
- नारायण राणेंना केंद्राचा जोर का झटका! सिंधुदुर्गातील चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश
- IND vs WI: अर्धशतक झाल्यानंतर सूर्याचे सेलिब्रेशन व्हायरल!
- रुपाली चाकणकरांनी संजय राऊतांना फटकारले, म्हणाल्या, “ठराविक पातळी सोडून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
