Share

“ ते म्हणाले होते, मी असे पर्यंत तुझे संघातील स्थान अढळ मात्र..” ; साहाचा गांगुलीबाबत मोठा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा याला श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर मात्र एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. रिद्धिमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. सौरव गांगुलीने दिलेला शब्द न पाळल्याचे रिद्धिमान साहाने सांगितले.

श्रीलंका दौऱ्यासाठी साहाला संघात जागा मिळाली नाही. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत गांगुलीबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला “कानपूर येथे न्यूझीलँडमध्ये ६१ धावा केल्यानंतर दादाने (गांगुली) माझे व्हॉट्सअॅपवर अभिनंदन केले आणि ‘मी इथे (बीसीसीआय) असेपर्यंत तू असशील ‘ असे सांगितले बीसीसीआय अध्यक्षांच्या अशा संदेशाने खरोखरच माझा आत्मविश्वास वाढवला. मला हे समजतच नाहीये की गोष्टी इतक्या वेगाने कशा बदलल्या ,”

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली विराट कोहली सोबतच्या तणावानंतर सतत वादाचा विषय बनला आहे. काही ना काही कारणाने त्याचे नाव चर्चेत येत असते. आता साहाच्या खुलास्याने त्यांच्या भोवती पुन्हा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दादाने अजून तरी साहाच्या या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र त्यांनी साहाला दिलेला शब्द न पाळल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!