Share

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह तंत्रज्ञानाचे धडे

Published On: 

जालना: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या कृषी संजीवनी ही मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम २१ जून रोजी सुरू करण्यात आली असून १ जुलै पर्यन्त ही मोहीम सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील या मोहिमेत समाविष्ट असणाऱ्या गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत असून याला शेतकऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक तसेच तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत.

या मोहिमेचा जास्तीत जस शेतकऱ्यांना लाभ मिळवा या साठी ग्राम संजीवनी समितीचे सदस्य, कृषिताई, होस्ट फार्मर आणि रिसोर्स फार्मर यांनी सक्रियपणे सहभागी होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान आणि प्रकल्पाचे लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी केलेल्या आहेत. यानुसार ही मोहीम राबवली जात असून थेट शेतावर प्रात्यक्षिकासह नवतंत्रज्ञान अवगत होत असल्याने शेतकऱ्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

खरीप हंगामात पेरणीसाठी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी पद्धती) वापरणे, लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करणे, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करणे, एक गाव एक कापूस वाण, ऊस लागवड, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल अभियानाबाबत मार्गदर्शन, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, तालुक्यातील दोन पिकांत उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, महत्त्वाच्या पिकांवरील कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व शेवटी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप अशी या मोहिमेतील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!