मुंबई : थॉमस कप (Thomas Cup Title 2022)मध्ये भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने विजेतेपदाच्या लढतीत १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा ३-०असा पराभव केला. स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारत प्रथमच अंतिम सामना खेळत होता. बेस्ट ऑफ ५ फॉरमॅटचा हा सामना भारताने ३-० असा जिंकला. भारताने एकेरी, दुहेरीपाठोपाठ दुसरा एकेरी सामनाही जिंकला. यामध्ये किंदम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा २१-१५, २३-२१ असा पराभव केला.
तत्पूर्वी, अंतिम दुहेरीचा सामना भारताने रोमहर्षक पद्धतीने खिशातल घातला. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने पहिला गेम गमावला, त्यानंतर दुसरा आणि तिसरा गेम जिंकून सामना जिंकला.
INDIA ARE CHAMPIONS! ????????
Kidambi Srikanth beats Jonatan Christie 21-15 23-21 as #TeamIndia beat 14-time champions Indonesia 3-0 to win a historic first ever #ThomasCup title. ????#BetterEveryDay pic.twitter.com/nUatIIdZwK
— JSW Sports (@jswsports) May 15, 2022
दुहेरीच्या पहिल्या गेममध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक यांचा पराभव झाला. इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान आणि केविन संजया सुकामुल्जो यांनी १७ मिनिटांत २१-१८असा गेम जिंकला. चिराग आणि सात्विकने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करताना अहसान आणि सुकामुल्जो या जोडीचा २३-२१ असा पराभव केला आणि त्यानंतर तिसरा गेम २१-१९ असा जिंकला.
HISTORY CREATED AT BANGKOK
For the first time in HISTORY, India wins the Thomas cup. #ThomasCup2022 #ThomasCup #ThomasUberCup2022 pic.twitter.com/LdOpP3gHfg
— Aditya Gupta (@adityavaisya) May 15, 2022
HISTORY SCRIPTED ????❤️
Pure show of grit and determination & India becomes the #ThomasCup champion for the 1️⃣st time in style, beating 14 times champions Indonesia ???????? 3-0 in the finals ????
It's coming home! ????????#TUC2022#ThomasCup2022#ThomasUberCups#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/GQ9pQmsSvP
— BAI Media (@BAI_Media) May 15, 2022
पहिल्या एकेरी सामन्यात युवा खेळाडू लक्ष्य सेनने अँथनी सिनिसुका गिंटिंगचा ८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला. थॉमस कपमध्ये भारताचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास नेत्रदीपक ठरला आहे. भारतीय संघाला अंतिम फेरीच्या प्रवासात चायनीज तैपेईविरुद्धच्या गटातील लढतीत एकमेव पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने ग्रुप स्टेज मॅचमध्ये जर्मनीचा ५-०, कॅनडाचा ५-० असा पराभव केला. त्याचवेळी चायनीज तैपेईकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत पाच वेळा विजेत्या मलेशियाचा पराभव केला, तर उपांत्य फेरीत ३२ वेळा अंतिम फेरी खेळणाऱ्या डेन्मार्कसारख्या संघाचा पराभव केला. डेन्मार्क २०१६चा विजेता संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

