Share

IPL 2022 : “…तर मला खूप आनंद होईल!”, शोएब अख्तरचं उमरान मलिकबाबत ‘दिलदार’ वक्तव्य!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उमरानने माझा सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मोडावा, असे अख्तरने म्हटले. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर आहे. त्याने १६१.३ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून विक्रम केला होता. आजपर्यंत त्याचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

अख्तर म्हणाला, ”मी प्रथमच एखाद्याला १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना पाहिले आहे. त्याने माझा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडला तर मला खूप आनंद होईल. त्याची कारकीर्द दीर्घकाळ व्हावी अशी माझी इच्छा आहे. काही दिवसांपूर्वीच कोणीतरी मला सांगत होते, की २० वर्षे झाली असून तुझा सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. मला विश्वास आहे, की विक्रम मोडण्यासाठी बनवले जातात आणि जर उमरानने माझा रेकॉर्ड तोडला तर मला खूप आनंद होईल.”

उमरान मलिकने आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त वेगवान गोलंदाजी करत आहे. उमरानची खास गोष्ट म्हणजे त्याच्याकडे वेगासोबत जबरदस्त यॉर्कर आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात उमरानने १५७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आणि विक्रम केला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!