मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता भाजप नेतेही पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
शिवसेनेच्या सभेत ना मुख्यमंत्री ना पक्षप्रमुख दिसले. घाबरलेला बिथरलेला आजारी माणूस दिसले. कालच्या भाषणानं मला त्यांची दया येत आहे. मी त्यांच्या डॉक्टरांना विनंती करतो. औषधांचा डोस कमी करावा. आजारी माणसाला इतका त्रास कुटुंब का देतंय? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, “चंद्रकांत खैरे जे बोलले ते अतिशय योग्य बोलले. नवनीत राणा प्रकरणी खैरेंनी शिवसैनिकांची अक्लल गुडघ्यात असते बोलले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रमुखांची अक्कल कुठे असेल हे सांगण्याची गरज वाटत नाही. दुसऱ्या व्यंगाबद्दल भाष्य करता मग तुमच्या मुलाच्या आवाजावरून म्याव म्याव आवाज काढला तर वाईट का वाटतं? उद्धव ठाकरे उभे राहिले असते तर हवेने उडून गेले असते असं आम्ही म्हणायचं का? तुम्हाला घाबरणारा महाराष्ट्रात कोण नाही. उगाच धमक्या व्यासपीठावरून देऊ नका”, असेही नितेश राणेंनी सांगितले.
तसेच मातोश्री नावावर ज्याने हेराफेरी केली तो काल सभेत होता. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांच्या आशीर्वादानेच घोटाळे होतात हे सिद्ध झाले आहे. जे मुंबईला अक्षरश: लुटले त्यांच्याविरोधात लढा सुरूच राहणार आहे. भ्रष्टाचारी माणसाचं समर्थन करावं लागत आहे. नवाब मलिकांनी दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार केले. त्याला समर्थन करून बाळासाहेबांच्या भूमिकेचा अपमान केला. संभाजीनगर नामांतर करण्याची गरज काय? असं म्हणताय. त्यामुळे त्यांच्यावर उपचारांची गरज आहे असंही नितेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


